Tue, Jun 18, 2019 23:14होमपेज › Marathwada › ‘त्या’ मृतदेहाचे रहस्य उकलले

‘त्या’ मृतदेहाचे रहस्य उकलले

Published On: Feb 11 2018 12:55AM | Last Updated: Feb 11 2018 12:48AMआष्टी : प्रतिनिधी

परतूर तालुक्यातील वरफळ येथील शेख मूनवर शेख नूर (38) याचा दैठणा शिवारात मृतदेह आढळला होता. दारूवरून वाद होऊन मूनवर याचा खून करण्यात आला. याप्रकरणी मृताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून सात जणांविरुद्ध आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेख मूनवर हा विहिरी खोदकामाचा गुत्तेदार होता. त्याचे दैठणा शिवारात विहीर खोदण्याचे काम सुरू होते. दैठणा येथील रमेश तायडे याने शेख मूनवर व त्याचा मित्र माउली ऊर्फ ज्ञानेश्‍वर आढाव यांना गुरुवारी रात्री दैठणा येथे जेवणासाठी बोलावले होते. दोघे रात्री शेतात जेवणासाठी आले असता त्या ठिकाणी सहा ते सात मजूूरही होते. जेवणासाठी तायडे याने दारू व मटणाचा बेत आखला होता. सर्व जण दारू पित असताना तायडे याने शेख मूनवर व आढाव यांना बिनापाण्याची कोरी दारू पिण्याचा आग्रह धरला होता. त्यामुळे मूनवर - तायडे व आढाव यांच्यात वाद झाला. यामुळे आढाव गावाकडे निघून गेला व मूनवर तेथेच होता. तेथे रमेश तायडे व इतरांनी दारू पिण्याच्या कारणावरून मूनवर यास जिवे मारून विहिरीत फेकले. याप्रकरणी मूनवरचा भाऊ शेख सरवर शेख नूर याच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार हे करीत आहेत.