Mon, Jun 17, 2019 02:11होमपेज › Marathwada › आंध्रलता आशालता करलगीकर यांचे निधन

आंध्रलता आशालता करलगीकर यांचे निधन

Published On: Dec 30 2017 11:23AM | Last Updated: Dec 30 2017 11:23AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

येथील ज्येष्ठ व सुप्रसिद्ध गायिका डॉ. आशालता करलगीकर यांचे दीर्घ आजाराने येथील रुग्णालयात शुक्रवार दि. २९ रोजी रात्री निधन झाले. त्या ७५ वर्षांच्या होत्या. 

हैदराबाद येथे लहानपणीच उत्कृष्ट गायिका म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला . पंडित नेहरू, इंदिरा गांधी, नीलम संजीव रेड्डी, लता मंगेशकर, मोहमद रफी आदी मान्यवरांसमोर त्यांनी आपली कला सादर करून प्रशंसा मिळविली होती. १९६३ साली अफगानिस्तान मधील काबूल येथे पं. भीमसेन जोशी, पं. सामताप्रसाद, ज्येष्ठ नृत्यांगना इंद्राणी रहमान अशा नामांकित कलाकारांबरोबर त्यांनी कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदविला.

त्यांच्या सांगीतिक कर्तुत्वामुळे त्यांना माजी राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद ह्यांनी 'आंध्रलता' हा किताब देऊन गौरविले होते. विमा कंपनीतून सेवानिवृत्त झालेल्या आशाताईंना सूरमणी, सुरश्री असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले होते. अतिशय नम्र, लाघवी व अभ्यासू गायिका गमावल्याने औरंगाबादच्या कलाविश्वात हळहळ व्यक्त होत आहे. 
त्यांच्या पश्चात पती वसंतराव करलगीकर, मुलगा निषाद, सून विद्या, मुलगी कविता, जावई किशन वतनी व नातवंडे असा परिवार आहे.