Sun, Jul 21, 2019 16:23
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › बीडमध्ये भाजप आमदारावर बलात्‍काराचा आरोप

बीडमध्ये भाजप आमदारावर बलात्‍काराचा आरोप

Published On: Mar 03 2018 7:27PM | Last Updated: Mar 03 2018 6:39PMबीड : प्रतिनिधी 

बीड जिल्ह्यातील एका भाजपा आमदाराने  आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार एका महिलेने केल्याने एकच खळबळ उडाली आहे. औरंगाबाद विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारंबे या तक्रारीची चौकशी करण्यासाठी शनिवारी दिवसभर बीडमध्ये तळ ठोकून होते.

बीड येथील एका दाम्‍पत्याने आपल्या मुलाला कायमची नोकरी मिळावी म्‍हणून भाजपा आमदारासोबत सुनेला अनैतिक संबंध ठेवण्यात भाग पाडले. या महिलेने बीडच्या पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दिली आहे. या तक्रारीमध्ये भाजप आमदाराविरोधात तक्रार केली आहे. 

पोलिस अधीक्षकांनी वरिष्ठांना या प्रकरणाची माहिती दिल्यानंतर औरंगाबाद विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी बीडला भेट दिली. या प्रकरणाची बीड परिसरात दिवसभर चर्चा होती.