Thu, Apr 25, 2019 13:25होमपेज › Marathwada › कोरेगाव भीमाचा मास्टरमाइंड कोण? : अजित पवार 

कोरेगाव भीमाचा मास्टरमाइंड कोण? : अजित पवार 

Published On: Jan 19 2018 4:20PM | Last Updated: Jan 19 2018 4:26PMलातूर : प्रतिनिधी

विद्यमान सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरले आहे. करू, पाहू , देऊ असाच पाढा ते वाचत आहेत. शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ मांडला आहे. अशी टीका आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी केली. लातूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोरेगाव भीमाचा मास्टरमाइंड कोण आहे याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

औसा तालुक्यातील एकंबी तांडा येथील शहाजी राठोड या शेतकऱ्याने महावितरणच्या चुकीच्या वीज बिलामूळे आत्महत्येचा प्रयत्न केला. या वेळी शेतकऱ्याला एक लाख रुपयांची मदत देण्यात आली. या भेटीनंतर अजित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

शासनाच्या धोरणाच्या विरोधात राष्ट्रवादी पक्षाने राज्यभरात हल्ला बोल आंदोलन सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यात पायी दिंडी आणि संघर्ष यात्रेला महाराष्ट्रातील जनतेचा भक्कम पाठींबा मिळाला आसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, शेतकऱ्यांना, कामगारांना, कर्मचाऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही असेही ते म्हणाले. आज लातूर जिल्ह्यात औसा, अहमदपूर, उदगीर येथे हल्लाबोल आंदोलन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या वेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रवक्ते नवाब मलिक उपस्थित होते.