Thu, Apr 25, 2019 23:28होमपेज › Marathwada › अहमदनगर जिल्‍ह्याच्या नामकरणासाठी बीडमध्ये मोर्चा

अहमदनगर जिल्‍ह्याच्या नामकरणासाठी बीडमध्ये मोर्चा

Published On: Dec 18 2017 3:37PM | Last Updated: Dec 18 2017 3:37PM

बुकमार्क करा

बीड :  उत्तम हजारे 

अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्यानगर असे नामकरण करण्यात यावे, या मागणीबरोबरच इतर मागण्यांसाठी सोमवारी धनगर समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. 

बीड येथील स्टेडियम भागातील अहिल्याबाई होळकर पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली. धनगर समाजाला एससीचे आरक्षण देण्यात यावे, सोलापूर विद्यापीठात अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्यात यावे, शेळया-मेढींसाठी चारा छावण्या सुरु करण्यात याव्या, नाईक महामंडळासाठी आर्थिक तरतूद करण्यात यावी, या मागण्यांबरोबरच, अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्यानगर असे नामकरण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याबाबत जिल्‍हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे. 

या मोर्चामध्ये जिल्‍ह्यातील धनगर समाजातील विविध संघटना सहभागी झाल्‍या होत्या.