होमपेज › Marathwada › जिल्हानिर्मितीसाठी वकील संघाचे धरणे

जिल्हानिर्मितीसाठी वकील संघाचे धरणे

Published On: Mar 15 2018 1:19AM | Last Updated: Mar 14 2018 11:11PMअंबासाखर : प्रतिनिधी 

अंबाजोगाई जिल्हानिर्मितीसाठी बुधवारी शहरातून वकिलांनी रॅली काढून उपजिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन केले. अंबाजोगाई जिल्हानिर्मितीची मागणी वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. शरद लोमटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या आंदोलनात वकील संघाचे सदस्य सहभागी झाले होते.  

अंबाजोगाई जिल्हा कृती समितीच्या वतीने येथील उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच 23 वा दिवस असून त्यास पाठिंबा म्हणून वकिलांनी अंबाजोगाई जिल्हा निर्मितीच्या घोषणा देत शहरातून रॅली काढली. त्यासोबत उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत अंबाजोगाई जिल्हा जाहीर करावा म्हणून शासनास निवेदन देऊन दिवसभर धरणे आंदोलनही केले.

यावेळी वकील संघाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. महाजेर अली उस्मानी, सचिव अ‍ॅड. बालाजी बडे, अ‍ॅड. अण्णासाहेब लोमटे अ‍ॅड. खोमणे, अ‍ॅड. एस. के. पठाण, अ‍ॅड. राजेश्वर पांगे, अ‍ॅड. बी. डी. पाटील, अ‍ॅड. अविनाश भोसले, अ‍ॅड. इस्माईल गवळी, अ‍ॅड. दिलीप चामनर, अ‍ॅड. अजित लोमटे, अ‍ॅड. चौरे, अ‍ॅड. दहिवाल, अ‍ॅड. निंबाळकर, अ‍ॅड. एच. आर. शेख यांच्यासह अनेक वकील आंदोलनात सहभागी झाले  होते. या वेळी अंबाजोगाई जिल्हा कृती समितीचे सदस्यही उपस्थित होते.