Fri, Apr 26, 2019 02:00होमपेज › Marathwada › मांडवा फाट्यावर आपघात; एक ठार चार जखमी

मांडवा फाट्यावर आपघात; एक ठार चार जखमी

Published On: Dec 21 2017 9:59AM | Last Updated: Dec 21 2017 9:59AM

बुकमार्क करा

परळी वैजनाथ : प्रतिनिधी 

तालुक्यातील मांडवा फाट्यावर आज (दि.२०) रात्री ११ च्या सुमारास दोन मोटारसायकलचा  आपघात होऊन एक ठार तर चार जखमी झाल्याची घटना घडली. जखमींना उपचारासाठी परळी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर  पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 

धर्मापूरी फाटा ते लातूर रस्त्यावर मांडवा गावाकडे वळणाऱ्या रस्त्यावर दोन मोटारसायकलची धडक होऊन भीषण अपघात झाल. या अपघातात मांडवा येथील रहिवासी तुकाराम गुट्टे वय ४० हे जागीच ठार झाले. तुकाराम हे परळीकडून मांडवा गावाकडे येत असताना फाट्यावर गावाकडे वळताना नंदनंजकडून धारावती तांडाकडे जाणाऱ्या मोटार सायकलची समोरासमोर धडक झाली. मयत तुकाराम हे ट्रॅक्टरवर चालक म्हणून कामाला असल्याचे कळते. 

या अपघातात चार जण जखमी झाले. जखमींमध्ये सचिन  रंगनाथ  पवार , बालु  देविदास  राठोड, नामदेव महादेव राठोड  रा. धारावती तांडा  आणि आमिर  नजीर  शेख रा. मांडवा यांचा समावेश आहे.