Sat, Apr 20, 2019 08:08होमपेज › Marathwada › लातूर-निझामाबाद रस्त्यावर भीषण अपघात;15 वऱ्हाडी ठार

लातूर-निझामाबाद रस्त्यावर भीषण अपघात;15 वऱ्हाडी ठार

Published On: May 12 2018 10:47AM | Last Updated: May 12 2018 11:21AMनांदेड : प्रतिनिधी

आयशर टेम्पो व टँकरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 15 वऱ्हाडी ठार झाले आहेत. लातूर-निझामाबाद रस्त्यावर जांब (ता. मुखेड, जि. नांदेड) येथे हा भीषण अपघात झाला. आज (शनिवार) सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अपघातात 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

खरोसा (ता. ओसा जि.लातूर) नारगे येथील नवरदेवाकडील मंडळी नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे लग्नासाठी वऱ्हाड घेऊन येत असताना लातूर-निझामाबाद राष्ट्रीय महामार्गावरील जांब येथे हा अपघात झाला. 

खरोसा येथील नारगे परिवारातील मुलाचा विवाह मुखेड येतील टी मकेकर यांच्या मुलीशी शनिवारी दि.12 मे रोजी होणार होता. खरोसा येथून लग्नासाठी महिला व लहान बालकांना घेऊन टेम्पो निघाला असता, जांब जवळ टँकरशी टेम्पोची धडक झाली. या अपघातात मृतांमध्ये सर्वाधिक महिलांचा समावेश आहे. यातील जखमींना जळकोट, मुखेड व नांदेड येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

मृतांना जाब येथील रुग्णालयात आणले असून मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा आहे. मृतांचा आकडा मोठा असल्याने ओळख पटण्यास उशीर लागत आहे. आतापर्यंत दहा मयतांची ओळख पटली आहे.

मृतांची नावे

रूक्मीणीबाई गोरोबा राजे रा.निटूरा.ता.ओसा वय.70
शमा सत्तार तांबोळी, रा.खरोसा ता.ओसा.वय.38
कस्तुराबाई फुलबागडेकर रा.मुरूम
अरुणा शेषराव नारगे, रा.लातूर वय.45
बाळू नागनाथ तिगलपल्ली, रा. वागदरा.ता.उमरगा
मदाबाई कुंभार, रा.मुरूम वय.60
मदाबाई बोडके, रा.खरोसा. ता. ओसा वय.45
सुमनबाई बाळू कुंभार, रा.वागदरी.ता.चाकूर वय.65
बालिका स्नेहा सुधीर कुऱ्हाडे, रा.मुमदापूर वय.10 वर्षे
तुकाराम बागले(चालक) रा.मुरबी

 

Tags : accident, latur nizamabad road, 15 people death, marathawada news