Fri, Apr 26, 2019 15:24होमपेज › Marathwada › वर्‍हाडाच्या टेम्पोची दुचाकीला धडक

वर्‍हाडाच्या टेम्पोची दुचाकीला धडक

Published On: Feb 21 2018 1:20AM | Last Updated: Feb 21 2018 1:02AMआर्वी : प्रतिनिधी

लग्नाचे वर्‍हाड घेऊन जाणार्‍या टेम्पोने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तीन युवक गंभीर जखमी झाले. ही घटना शिरूर तालुक्यातील खालापुरीजवळ मंगळवारी दुपारी घडली. अपघातानंतर चालकाने टेम्पो न थांबवता पळून जाण्याचा प्रयत्न केला.  

ग्रामस्थांनी टेम्पोचा सात किलोमिटर पाठलाग करून चालकाला पकडले शिरूर तालुक्यातील आर्वी येथील धनराज मळेकर, नितीन घरगीने व गोटू यादव हे  दुचाकीवरून (एम एच23  एम 4749) आर्वीहून बीडकडे जात होते. खालापुरी जवळ बीडहून मुंगुसवाडे (जि. नगर) येथे वर्‍हाड घेऊन जाणार्‍या टेम्पोने (एमएच14, एएच 6150) दुचाकीस समोरून जोराची धडक दिली. या अपघातात तीनही युवक गंभीर जखमी झाले. अपघातानंतही चालकाने टेम्पो न थांबवता पळ काढला. याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी टेम्पोचा पाठलाग केला. सात किलोमीटरवर आर्वी गावात ग्रामस्थांनी टेम्पो अडवला, दरम्यान या अपघातात जखमी झालेल्या युवकांना  उपचारासाठी बीड येथे एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दोन तास वर्‍हाडीचा खोळंबा
दुचाकीस धडक देऊन टेम्पो चालकाने पळ काढला. जखमींना मदत न केल्याने याचा रोष ग्रामस्थांनी वर्‍हाडींवर काढला. हा  टेम्पो दोन तास जागेवरच थांबून ठेवला. यामुळे वर्‍हाडींना लग्नास जाण्यास दोन तास उशीर झाला.