Sat, Jul 20, 2019 08:35होमपेज › Marathwada › ऊस तोड मजुराचा ट्रक्‍टरखाली सापडून मृत्‍यू

ऊस तोड मजुराचा ट्रक्‍टरखाली सापडून मृत्‍यू

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

केसापुरी : प्रतिनिधी

तालुक्यातील मोगरा येथील उसाच्या फडात झोपलेल्या ऊस तोड मजुराचा  ट्रॅक्टर खाली दबून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी  रात्री घडली. 

सद्या तालुक्यातील कारखाने सुरु आसल्याने सर्वत्र ऊस तोडणी सुरु आहे. दि. २४ रोजी तालुक्यातील मोगरा या गावी ऊस तोडणी सुरु आहे. शुक्रवारी दिवसभर ऊस तोडून ट्रॅक्टरची भरती करून रात्री त्याच फडात सर्व मजूर  झोपले होते. यावेळी  काही वेळाने पुन्हा ऊस भरण्यासाठी ट्रॅक्टर त्या फडात आला त्यावेळी अंधारात ट्रक्‍टर चालकाला दिसले नसल्‍याने रघुनाथ जीवन जाधव यांचा ट्रक्‍टर खाली सापडून मृत्‍यू झाला. या प्रकरणी दिंद्रुड पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास चालू आहे.