Wed, Jul 17, 2019 18:45होमपेज › Marathwada › नांदेड - परभणी मार्गावर भीषण अपघात, आसेगावचे तिघे ठार

नांदेड - परभणी मार्गावर भीषण अपघात, आसेगावचे तिघे ठार

Published On: Jan 12 2018 10:09AM | Last Updated: Jan 12 2018 10:08AM

बुकमार्क करा
वसमत : प्रतिनिधी 

नांदेड परभणी मार्गावरील उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॉलीवर स्विप्ट कार जोरात आदळली. या अपघातात  परभणी जिल्ह्यातील ३ जण जागीच ठार झाले आहे. या अपघातासंदर्भात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती. 

वसमत शहरातील नांदेड परभणी मार्गावर आसलेल्या मयुरी हॉटेल जवळ पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास नांदेड येथुन परभणी कडे जाणाऱ्या स्विप्ट कारने (एम. एच. २२ यु ६४७९) उभ्या उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या मागच्या बाजूस धडक दिली. उसाच्या दोन्ही ट्रॉल्यामधे कार घुसल्याने त्यातील सोपान एकनाथ पवार (वय ३५), दत्ता सुंदर पवार (वय ३८), गणेश पिराजी गुंजकर (वय ३२) हे जागीच ठार झाले. हे सर्व परभणीतील जिंतुर तालुक्यातील आसेगावचे रहिवाशी आहेत. आपघात एवढा भीषण होता की कारच्या समोरील बाजुचा चुराडा झाला. रात्री घटनास्थळी शहर ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मोरे यांच्यासह पोलिस कर्मचार्यांनी धाव घेतली. सदरील प्रकरणी शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.