Sun, Jul 21, 2019 12:05होमपेज › Marathwada › कारच्या धडकेत एक ठार, जमावाने  कार पेटवली

कारच्या धडकेत एक ठार, जमावाने  कार पेटवली

Published On: Jul 22 2018 8:03AM | Last Updated: Jul 22 2018 8:03AMलातूर : प्रतिनिधी 

कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. अपघातानंतर संतप्त जमावाने कार पेटवून दिली. लातूर  शहरानजीक वासनगाव पाटीजवळ शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी कार चालका विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. हरिदास जाधव असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्‍वाराचे नाव आहे.

औसा रोड वरून एक इंडिका कार भरधाव वेगात लातूरकडे येत होती. ती वासनगाव पाटीजवळ आली असता चालकाचा कारवरील ताबा सुटल्‍याने कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीवरील जाधव यांचा जागीच मृत्‍यू झाला.  त्यानंतर या कारने अन्य एका दुचाकीला धडक दिली त्यात एक लहान बालक व दोन दुचाकीस्वार जखमी झाले. या घटनेने  पाटीवर असलेले नागरिक संतप्त झाले. संपप्त जमाव कारकडे धावलाल्‍यांनतर कारचालकाने कार घटनास्‍थळी सोडून घटनास्‍थळावरून पळ काढला. त्‍यानंतर संतप्त जमावाने कार पेटवून दिली. पोलिस घटनास्थळी पोहचेपर्यंत कार पूर्ण जळून खाक झाली होती.