Thu, Apr 25, 2019 21:25होमपेज › Marathwada › अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकल वरील एक ठार तीन जखमी

अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकल वरील एक ठार तीन जखमी

Published On: Apr 30 2018 1:48AM | Last Updated: Apr 30 2018 1:44AMकेज : दीपक नाईकवाडे 

केजहुन नांदुरकडे जात असलेल्या सय्यद दाम्पत्याच्याच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील एक जण जागीच ठार झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत.जखमीं केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.सदर अपघात केजपासुन एक किलोमीटर अंतरावरील पद्मा जिनिंग जवळ रविवारी रात्री आठच्या सुमारास घडला आहे. 

नांदुर येथील सय्यद दाम्पत्य रविवारी रात्री आठच्या सुमारास केज येथून नांदुरकडे मोटारसायकल (क्र.. एम एच १६ एस ६८३८) वरुन जात असताना त्यांच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील सय्यद रोफ हमजा ( नांदुर)हे जागीच ठार झाले तर मोटारसायकलवर त्यांच्या पाठीमागे बसलेली त्यांची पत्नी सुलताना रोफ सय्यद यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. मोटारसायकलवरील सय्यद यांची मुले अरमान रोफ सय्यद वय दहा वर्षे व मदिना रोफ सय्यद वय पाच वर्षे यांच्या पायास मार लागल्याने त्यांचे पाय मोडले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल लोखंडे यांनी घटनास्थळी धाव घेवून जखमीना खाजगी वाहनातून उपचारासाठी केज उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.