Wed, Jul 17, 2019 12:14होमपेज › Marathwada › भोकरदन जवळ अपघात, बारावीचे दोन परीक्षार्थी ठार

भोकरदन जवळ अपघात, बारावीचे दोन परीक्षार्थी ठार

Published On: Feb 21 2018 3:02PM | Last Updated: Feb 21 2018 3:02PMभोकरदन (जालना) : प्रतिनिधी

भोकरदन तालुक्यातील तडेगाव वाडी येथील १२ वीच्या परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दुचाकीला जालना रस्त्यावर ट्रकने धडक दिली. या अपघातात दोन परीक्षार्थी जागीच ठार झाले तर, एक परीक्षार्थी गंभीर जखमी झाला आहे. करण कलुसिंग सुंदरडे व अनिल केसरसिंग घुनावत (रा. तडेगाव वाडी)अशी अपघातात ठार झालेल्‍यांची नावे आहेत. जखमीला उपचारासाठी औरंगाबाद येथील रूग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे.  

याबाबत अधिक माहिती अशी, करण आणि अनिल रामेश्वर महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. दोघांचेही १२ वीच्या परीक्षेसाठी भोकरदन येथे केंद्र आले होते. आज पहिलाच पेपर असल्याने ते दोघेही परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहचण्यासाठी सुनील रूपसिंग घुनावत याच्या दुचाकीवरून ( क्रमांक एम एच 21 ए एक्स 9392 ) जात होते. याच दरम्यान शहराजवळील जालना रोडवरील कृषी कार्यालयासमोर  विरुद्ध दिशेने भोकरदनकडून जालन्याकडे जाणाऱ्या ट्रकने ( जीजे 18 ऐक्स 1977 ) त्यांना धडक दिली. या भीषण अपघातात सुनीलच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर, करण व अनिल हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना अधिक उपचारासाठी औरंगाबाद येथे हलवण्यात येत असताना फुलंब्री जवळ करनचे निधन झाले. अनीलवर सध्या उपचार सुरू आहेत.

अपघातातील ट्रक चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.