Sun, Jul 21, 2019 07:56होमपेज › Marathwada › वसमत येथे बस-दुचाकी अपघातात तीन जण ठार 

वसमत येथे बस-दुचाकी अपघातात तीन जण ठार 

Published On: Jun 06 2018 4:26PM | Last Updated: Jun 06 2018 4:26PMवसमत (जि. हिंगोली): प्रतिनिधी

वसमत-नांदेड महमार्गावरील हिरो होंन्डा मोटार सायकल एजन्सी जवळ झालेल्या बस आणि दुचाकीच्या भीषण  आपघातात तीन तरुण ठार झाले आहेत. संजय कांबळे (वय २३), खंडू मदन इंगोले (वय २२) आणि सुनील सखाराम खरे (वय २३ ) अशी अपघातात ठार झालेल्‍यांची नावे आहेत. या प्रकरणी शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसमत-नांदेड मार्गावरील हिरो होंन्डा मोटार सायकल एजन्सी जवळ दुपारी १ वाजण्याच्या सुमारास निजामबाद-औरंगाबाद बसने (क्रमांक, एम एच २० बी एल ३५९९)  समोररून येणाऱ्या दुचाकीला (क्र एम एच २६ ऐ क्यु २७५) जोरदार धडक दिली. यात संजय कांबळे आणि खंडू इंगोले हे दोघे जण जागिच ठार झाले तर सुनील गंभीर जखमी झाल्‍याने त्‍याला तात्‍काळ वसमत उपजिल्‍हा रूग्‍णालयात दाखल केले. याठिकाणी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्‍याला नांदेल येथे हलविण्यात आले मात्र, वाटेतलच त्‍याचा मृत्‍यू झाला. 

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकिरण काशीद, फौजदार रुपाली कांबळे, राजू सिद्दीकी, साहेबराव चव्हाण, केन्द्रे, सह पोलिस घटना स्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून  रस्‍त्‍यावरील वाहतूक सुरळीत केली.