Wed, Jul 08, 2020 04:34होमपेज › Marathwada › श्रीगोंद्यात दोन हरणांचा मृत्यू 

श्रीगोंद्यात दोन हरणांचा मृत्यू 

Published On: May 05 2018 10:42PM | Last Updated: May 05 2018 10:42PMश्रीगोंदा - प्रतिनिधी 

श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव येथे कुत्र्यांच्या हल्यात एक हरणाचा तर येळपणे येथे अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका हरणाचा मृत्यू झाला . एकाच दिवशी दोन हरणांचा मृत्यू झाल्याने वन विभागात एकच खळबळ उडाली आहे .

याबाबत अधिक माहिती अशी की,  मढेवडगाव येथे शुक्रवारी(४)  दुपारी कुत्र्यांनी केलेल्या हल्यात एक हरीण जखमी झाले. त्याला उपचारासाठी बेलवंडी येथील पशू वैद्यकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले होते मात्र, उपचारादरम्यान त्‍याचा मृत्यू झाला. येळपणे येथे वाहनाच्या धडकेने जखमी झालेले हरीण शनिवारी मृत्यू पावले .

दोघा हरणांचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत जगताप यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले आहे. शनिवारी  संध्याकाळी पाच वाजताच्या दरम्यान दोन्ही  हरणावर एकत्रीत अंत्यसंस्कार करण्यात आले .