Sat, Apr 20, 2019 10:07होमपेज › Marathwada › पिस्तुलाची चर्चा अन् पोलिसांचा खर्चा

पिस्तुलाची चर्चा अन् पोलिसांचा खर्चा

Published On: Feb 13 2018 2:52AM | Last Updated: Feb 13 2018 2:46AMवडवणी : प्रतिनिधी

एक तरुण पिस्तूल घेऊन वडवणी तालुक्यातील चिंचाळ्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पिस्तुलधारी तरुणाला पकडण्यासाठी वडवणी पोलिसांचे पथक चिंचाळ्यात गेले. माजलगावच्या पोलिस उपअधिक्षकांनीही चार तास घालवीत चिंचाळा परिसर पिंजला मात्र काहीच हाती लागले नाही. पिस्तुलाच्या चर्चेने पोलिस प्रशासनाला मात्र हा भाग पिंजून काढताना वाहन फिरविण्याचा खर्च करावा लागला.

वडवणी तालुक्यातील चिंचाळा येथे अशोक माध्यमिक विद्यालयात परिसरातील गावातील विद्यार्थी शिक्षण घेतात. सध्या बारावीच्या प्रॅक्टिकल परीक्षा सुरू आहेत. या परीक्षेसाठी आलेल्या एका मुलीचा पाठलाग करत एक तरुण आला होता. या तरुणाला काही जणांनी चोप दिल्याची व तरुणाजवळ पिस्तूल असल्याची चर्चा  चिंचाळा गावात सुरू होती. वडवणी पोलिस ठाण्यात देखील काही ग्रामस्थांनी याची माहिती दिली. पोलिस उपनिरीक्षक निळकंठ सोनवणे  काही सहकार्‍यांना घेऊन चिंचाळ्यात दाखल झाले. चिंचाळा आणि परिसरातील कुप्पा, धानोरा, दुकडेगाव, तिगाव आदी परिसरात फिरून  त्यांनी तपास केला. 

एक तरुण पिस्तुलधारी होता. त्याच्या जवळील पिस्तुल काही जणांनी पाहिले अशी ओझरती माहिती काही ठिकाणी पोलिसांना मिळत होती, परंतु ठोस माहिती कुणीच सांगत नसल्याने पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. माजलगावच्या पोलिस उपअधिक्षक भाग्यश्री नवटके यांनी देखील चिंचाळा गाठले. तेथे त्यांनी सविस्तर 
माहिती घेतली.