Tue, Apr 23, 2019 00:34होमपेज › Marathwada › अकोला : ‘आप’च्या बेपत्ता नेत्यासह एकाचा खून

अकोला : ‘आप’च्या बेपत्ता नेत्यासह एकाचा खून

Published On: Aug 05 2018 8:35AM | Last Updated: Aug 05 2018 8:35AMअकोला : प्रतिनिधी

अकोला येथील आम आदमी पक्षाचे बेपत्ता नेते मुकीम अहेमद आणि बुलडाणा जिल्हातील साखरखेर्डा येथील शफी कादरी यांचे मृतदेह शनिवारी बुलडाणा जिल्ह्यातील जानेफळ शिवारातील जंगलात सापडल्याने खळबळ उडाली आहे.

या दोघांची हत्या पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून गंडविणार्‍या टोळीशी संबंधातून झाल्याचा संशय आहे. आपचे नेता मुकीम अहमद आणि शफी कादरी 4 दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांची बेपत्ता असल्याची तक्रार अकोला पोलिस ठाण्यात देण्यात आली होती.

दोन ऑगस्ट रोजी शहनाज यांच्या तक्रारीवरून अकोला खदान पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अकोल्याचे पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांनी सहा अधिकार्‍यांचे एक पथक तपासासाठी स्थापन केले होते. या प्रकरणात दोन संशयितांना यापूर्वी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर अकोल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी मानेपोलिस रामेेशर चव्हाण आणि पथक दोन दिवसापासून बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर, लोणार, सिंदखेड राजा तालुक्याच्या पट्ट्यात या प्रकरणाचा तपास करीत होती. शनिवारी दुपारी या दोघांचे मृतदेह या जंगल भागात सापडले. दोघांचेही मृतदेह कुजलेले असल्याने घटनास्थळीच त्यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. मुकीम अहेमद आणि शफी कादरी यांना अकोला येथे जेवणास बोलावून तेथे 30 जुलै रोजी त्यांचा गळा आवळून खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती होती. 

या प्रकरणात जवळपास 15 आरोपी असण्याची शक्यता असून वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील वाकद परिसरातील तीन, बुलडाणा जिल्ह्यातील सहा ते सात आणि अकोला जिल्ह्यातील चार आरोपींचा यात समावेश असल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. प्रकरणात पोलिसांनी प्रारंभी मुकीम अहेमद यांच्या पत्नी शहनाज यांच्या तक्रारीवरून तसव्वुर खान कादरी, कौसर शेख, शेख चांद, अजीम, शेख कलंदर, शेख मुजफ्पर आणि शेख अकिल यांच्यासह अन्य काही जणावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात अकोला पोलिसांनी आतापर्यंत पाच ते सात जणांना ताब्यात घेतले आहे.