Wed, Jul 24, 2019 12:30होमपेज › Marathwada › एक रुपयाच्या कर्जासाठी शेतकर्‍याला वेठीस धरले

एक रुपयाच्या कर्जासाठी शेतकर्‍याला वेठीस धरले

Published On: Jan 17 2018 7:17PM | Last Updated: Jan 17 2018 7:03PM

बुकमार्क करा
नागपूर : प्रतिनिधी

एकीकडे शेतकरी कर्जमाफीच्या व इतर बोज्याखाली दबलेला असतांना बुलडाणा जिल्ह्याच्या मलकापूर येथील एका शेतकर्‍याला फायनान्स कंपनीने फक्त एका रूपयाच्या कर्जासाठी वेठीस धरले आहे. आधी 1 रूपयाचा भरणा करा त्यानंतर एका महीन्याने नाहरकत प्रमाणपत्र देऊ, असा अजब फतवा कंपनीने काढून एका शेतकर्‍याची अवहेलना केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जगदीश दिनकर कांडेलकर असे या शेतकर्‍याचे नाव असून याशेतकर्‍याने फायनान्स कंपनीकडून त्यांचेच कंपनीचे ट्रॅक्टर 65 लाख रूपयांना कंपनी कडून फायनान्स करून घेतला होता. तर कंपनीने कर्जापोटी दिलेल्या हप्त्यानुसार सर्व हप्तेही भरले, तर शेवटचा हप्ता 19 डिसेंबर रोजी 15 हजार रुपये भरून पुर्ण रक्कम खात्यात जमा करून खाते निल केले.

दरम्यान मोठेबाबांच्या किडनी आजाराच्या उपचारासाठी पुन्हा नव्याने कर्ज घेण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी कंपनीकडे केली होती. मात्र तुमच्याकडे 1 रूपया पुन्हा कर्जरूपी निघत असून ते भरा नंतर तुम्हाला एका महीन्याने नाहरकत प्रमाणपत्र देऊ असा अजब फतवा त्या फायनान्स कंपनीच्या अधिकार्‍याने शेतकर्‍यांला सांगितले. त्यामुळे शेतकर्‍याने मी हे पैसे भरतो मात्र मला त्वरित नाहरकत प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी केली असता अधिकार्‍यांनी त्याचेकडे साफ दुर्लक्ष करीत सदर शेतकर्‍याची अवहेलना केल्याची बाब समोर आली आहे. तर या फायनान्स कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री, कृषिमंत्री, जिल्हाधिकारी यांना सादर केलेल्या निवेदनातून केली आहे.