Mon, Aug 26, 2019 02:23होमपेज › Marathwada › भरवस्तीतील बिर्‍हाड आजही कायमच

भरवस्तीतील बिर्‍हाड आजही कायमच

Published On: Jul 04 2018 2:15AM | Last Updated: Jul 03 2018 8:54PMपरभणी : नरहरी चौधरी 

जिल्हा परिषद पशुसवंर्धन विभागाचे पोल्ट्री फार्म परभणी शहरातील गंगाखेड रस्त्यावर भरवस्तीत आहे. शासन नियमाप्रमाणे हा फार्म वर्दळ, मोकाट जनावरांचे वास्तव्य यापासून दूर असणे आवश्यक आहे. परंतु  सध्या वर्दळीच्या ठिकाणी तो सुरू असून ,तेथे सुविधांचा अभाव आहे. येथील कोंबड्यांकरिता चार गोदामांची उभारणी केलेली आहे. आजही हे बिर्‍हाड भरवस्तीत कायम असल्याने ज्या गोदामात कोंबड्या आहेत, त्यास तब्बल तीन ते चार कुलूप लावण्याची वेळ येत आहे. 

50 वर्षांपासून हा फार्म परभणीत आहे. 2007 पर्यत राज्य शासनाच्या ताब्यात होता. तो आता जिल्हा परिषदेकडे गेला.  त्याची मोठी दुर्दशा झाली होती. त्यामुळे 2007 ते 2012 या कालावधीत तो बंद होता. यानंतर जिल्हा नियोजन समिती व इतर माध्यमातून निधी उपलब्ध झाल्यानंतर गोदामांची दुरुस्ती झाली. त्यानंतर दीड वर्षाचा एक असा कोंबडीचा टप्पा याठिकाणी ठेवला.

फार्म वस्तीत व वर्दळीत नसावा ,यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी एस.पी.सिंह यांनी तो शहरापासून 10 किमी अंतरावर नेण्याचे आदेश दिले होते, पण तो आजही त्याचठिकाणी कार्यरत राहिलेला आहे. औरंगाबाद येथील सेंट्रल नॅचरली येथे मशिनद्वारे अंड्ड्यातून पिल्‍ले तयार करण्याची प्रक्रिया होते. येथे सध्या सहा कर्मचारी आहेत.  यात 1 पशुधन विकास अधिकारी, 1 सहाय्यक पशुधन अधिकारी, 4 शिपाई आहेत. फार्ममध्ये आलेली एक कोंबडी 72 आठवड्यापर्यंत 150 अंडी देतात. हे प्रमाण कमी झाले की शासनाच्या 75 रुपये किलो दराप्रमाणे त्याची विक्री केली जाते.