Sun, Nov 18, 2018 00:47होमपेज › Marathwada › देशाला दोन पंतप्रधान; ‘झेडपी’च्या कृषी विभागाची कृपा

‘झेडपी’च्या कृषी विभागाच्या कृपेने दोन पंतप्रधान

Published On: Sep 07 2018 1:21AM | Last Updated: Sep 07 2018 8:11AMपरभणी ः प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना थेट पंतप्रधानाचा दर्जा देवून टाकल्याचे जि.प.समोर लावण्यात आलेले झळकत असल्याचे पाहुन नागरिकांमधून संताप व्यक्त केल्या जात आहेत. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने संदर्भातील माहिती देणारे बॅनर कृषी विभागाने कार्यालया समोर लावले आहे. योजनेचे उद्दिष्ट, अर्जाची कार्यपध्दती, व्याप्ती, राबविणारी यंत्रणा, पात्रतेचे निकष राबविणारी यंत्रणा, अनुदान, नवीन विहीर पॅकेज, जुनी विहीर दुरुस्ती पॅकेज, शेततळ्याचे प्लास्टीक अस्तरीकरण पॅकेज, संपर्क कार्यालय इत्यादी संदर्भातील माहिती देण्यात आली. बॅनरवरील उजव्या बाजूस पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री  फडणवीस यांचे फोटो लावलेले आहेत. त्याखाली त्यांचे पद दिले आहे. त्यात दोघांनाही पंतप्रधान असल्याचे दाखविण्यात आले आहे.  यामुळे या बॅनरकडे पाहून नागरिकांना ही जि.प.ची भविष्यवाणी आहे की,काय जाणिवपूर्वकरित्या केलेली चुक आहे याची कसुन चौकशी करुन सबंधीत अधिकार्‍यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.