Thu, Jun 27, 2019 11:41होमपेज › Marathwada › युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

Published On: May 03 2018 1:30AM | Last Updated: May 02 2018 9:05PMहिंगोली : प्रतिनिधी

शहरातली कटके गल्‍ली पेन्शनपुरा भागात राहणार्‍या 22 वर्षीय युवकाने कयाधू नदीच्या पुलाला नायलोनची दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना दि. 1 मे रोजी सकाळी 6 च्या सुमारास घडली. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

कटके गल्‍लीत राहणार्‍या गणेश बाबूराव बनसोडे वय 22 वर्षे याने मंगळवारी सकाळी 6 च्या सुमारास शहरानजीक असलेल्या कयाधू नदीच्या पुलाखाली पुलाच्या कडठ्याला नायलोन दोरी बांधून आत्महत्या केली. या घटनेची माहिती ग्रामीण पोलिस ठाण्याचे जमादार हरकळ, पोलिस नायक पोकळे यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मयताने नेमकी कशामुळे आत्महत्या केली याबाबत पोलिसांकडे कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक मारोती थोरात यांनी दिली.