Thu, Jul 18, 2019 00:25होमपेज › Marathwada › तरुणांनी आठ गरजू कुटुंबांना दिले शौचालय बांधून

तरुणांनी आठ गरजू कुटुंबांना दिले शौचालय बांधून

Published On: Feb 11 2018 12:55AM | Last Updated: Feb 10 2018 9:39PMदिंद्रूड : प्रतिनिधी

स्वच्छ भारतचा डंका चौफेर होत असताना आजही अनेकांना परिस्थिती अभावी शौचालय बांधता येत नाही. शौचालय नसल्याने अनेकांची कुचंबना होते. हिच गोष्ट ओळखून दिंद्रूड येथील दोघा तरुणांनी गावातील गरजूंना आठ शौचालय बांधून देत समाजापुढे नवीन आदर्श निर्माण केला आहे. 

दिंद्रूड ग्रामपंचायतकडून गेल्या वर्षभरापासून स्वच्छ भारत मोहीम राबविली जात आहे. यासाठी ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांना शौचालय बांधण्यास सांगितले जात आहे. यासाठी सरपंच ज्योती अतुल ठोंबरे या स्वत: ग्रामस्थांना प्रोत्साहन करीत आहेत. या मोहिमेमुळे अनेकांनी शौचालय बांधले आहे. असे असले तरी गावातील काही गरजुंना इच्छा असूनही आर्थिक परिस्थितीमुळे शौचालय बांधता आले नाही. हिच बाब ओळखून गावातील  दत्तात्रय ठोंबरे यांनी  सात गरजू कुटुंबांना तर अमोल ढोले यांनी एका कुटुंबास शौचालय बांधून दिले आहे. त्यांच्या या अनोख्या मदत कार्याची दिंदू्रडसह परिसरात चर्चा होत आहे.

तरुणांचेे मान्यवरांनी केले कौतुक

आर्थिक परिस्थितीमुळे शौचालय बांधणे शक्य नसलेल्या ग्रामस्थांना दत्तात्रय ठोंबरे व अमोल ढोले यांनी आठ गरजुंना शौचालय बांधून देत गाव पाणंदमुक्त करण्यास गती दिली. या त्यांच्या कार्याची माहिती आ. आर. टी. देशमुख, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी ओमप्रकाश शेटे यांना होताच त्यांनी या तरुणांचा सत्कार करत कौतुक केले.