Wed, Nov 14, 2018 18:42होमपेज › Marathwada › झाडे जगवण्यासाठी तरुणांचा ‘जागर’

झाडे जगवण्यासाठी तरुणांचा ‘जागर’

Published On: May 22 2018 1:28AM | Last Updated: May 21 2018 10:53PMउमापूर : राजेंद्र नाटकर

शाळेतील वातावरण अल्हाददायक रहावे, शाळा सुंदर दिसावी यासाठी ठाकरवाडी येथील शाळा परिसरात विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. परंतु विजेअभावी या झाडांना पाणी देेणे अवघड होऊन बसले होते. यावर मार्ग काढत तरुणांनी रात्रभर जागून पाणी देण्याची मोहीम हाती घेतली असून यामुळे भर उन्हाळ्यातही शाळा परिसर हिरवागार दिसत आहे.

ठाकरवाडी येथील शाळा परिसरात जवळपास 55 झाडे लावण्यात आली आहेत. या झाडांचे संगोपन करण्यासाठी पाणी कमी पडत होते. यावर शिवाजी जाधव यांनी स्वतःच्या बोअरचे पाणी पाईपलाईन करुन उपलब्ध केले. परंतु सध्या सुटीचे दिवस, त्यातच विजेचा लपंडाव यामुळे अडचणी येत होत्या. उन्हाळ्यात पाणी न मिळाल्याने झाडे सुकून जाण्याचा धोका होता. झाडांना पाणी देण्याची जबाबदारी असलेल्या विलास जाधव, आकाश जाधव, विष्णू राठोड, लहू राठोड, अविनाश चव्हाण, ज्ञानेश्वर पवार यांनी रात्री 12 वाजता लाईट आल्यावर पाणी देण्याचे काम सुरु केले आहे. यामुळे झाडे भर उन्हाळ्यातही टवटवीत दिसत असून गावकर्‍यांमधून या तरुणांच्या  कार्याचे कौतुक होत आहे.