Sat, Jul 20, 2019 23:23होमपेज › Marathwada › किल्लारीत दोन तरुणाला बेदम मारहाण

किल्लारीत दोन तरुणाला बेदम मारहाण

Published On: May 02 2018 9:16PM | Last Updated: May 02 2018 9:11PMलातूर : प्रतिनिधी

 १मे रोजी रात्री आठच्या दरम्यान किल्लारी येथील काही लोकांनी दोन तरुणांना बेदम मारहाण केली. तरुणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तौफिक तय्याब शिरगापुरे व आपू बिराजदार अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणी नऊ जणांवर किल्लारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना  अटक करण्यात आली आहे.

 गावातील विक्रम सोनटक्के, गणेश माने, मालिनाथ दंडगुले, दिगमबर भोसले व त्यांचा मुलगा, बाळू भोसले व त्यांचा मुलगा , कमलाकर नाना, राहुल कदम, यांनी मालिनाथ दंडगुले याना पाठवून तौफिक तय्याब शिरगापुरे व आपू बिराजदार, यांना जबरीने मोटारसायकलवर बसवून हॉटेल सेंटर पॉईंटच्या रूममध्ये कोंडून ठेवले होते. एका मुलीची व शिक्षक राहुल कदम यांची बदनामी करत आहात असे म्हणत त्यांच्या अंगावरील कपडे काढून अर्वाच्य शिवीगाळ करत पट्टा, वायर व काठीने बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये या तरुणांचे अंग काळे निळे झाले. ही घटना समजल्यावर मारहाण झालेल्या मुलाचे नातेवाईक संतप्त झाले व त्यानी आरोपीच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यात  ठियया दिला. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांनी किल्लारीस भेट दिली व आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. तौफिक शिरगापुरे याने फिर्याद दिली आहे.