Sun, Jan 20, 2019 20:34होमपेज › Marathwada › तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Published On: Jan 25 2018 6:37PM | Last Updated: Jan 25 2018 6:37PMनांदेड: प्रतिनिधी 

शेतातील नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून २३ वर्षांच्या तरुण शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नांदेडमध्ये घडली. बाभुळगाव (ता. नांदेड) शिवारात मंगळवारी सायंकाळी तरुण शेतकऱ्याने आपले जीवन यात्रा संपवली. 

अजित पुंडलिक मेकाले (वय २३) या तरुण शेतकर्‍याच्या वडिलाने शेतीसाठी बँकेचे कर्ज उचलले होते. शेतातील नापिकी, बहिणीच्या लग्नाचा खर्च व बँकेच्या कर्जाची परतफेड कशी करायची अशा कारणावरुन अजितने बाभुळगावात असलेल्या वाघाळेकर यांच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली.