Wed, Mar 20, 2019 02:37होमपेज › Marathwada › यवतमाळमध्ये भीषण अपघात, दिल्लीचे १० जण ठार 

यवतमाळ : भीषण अपघातात दिल्लीचे १० जण ठार

Published On: Jun 01 2018 9:15AM | Last Updated: Jun 01 2018 10:13AMयवतमाळ : पुढारी ऑनलाईन 

यवतमाळमध्ये झालेल्या ट्रक आणि तवेराच्या  भीषण अपघातात दिल्लीच्या कुटुंबातील १० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातात तवेरा गाडीची झालेली अवस्था पाहिल्यावर अपघात किती भिषण होता याची कल्पना येते. 

दिल्लीतून तीन गाड्या करुन एक शिख कुटुंब नांदेडला दर्शनासाठी येत होते. त्यावेळी नागपूर- बोरी- तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर कोसदनी घाटात त्यातील एक कारला अपघात झाला. या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला. यामध्ये चार पुरुष, चार महिला आणि दोन मुलींचा समावेश आहे. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींवर यवतमाळ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

Tags : Yavatmal news, accident, Delhi base shikh family 10 persons died