होमपेज › Marathwada › दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका पोलिस ठाण्यात

दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका पोलिस ठाण्यात

Published On: Mar 06 2018 1:39AM | Last Updated: Mar 06 2018 1:38AMकेज : प्रतिनिधी

गटसाधन केंद्रातील उत्तर पत्रिकांची आगीत होळी झाल्याने सोमवार पासून दहावी व बारावीच्या उत्तरपत्रिकांना सील करून सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिस ठाण्याच्या कस्टडी मध्ये ठेवण्यात येणार आहेत.

केज येथील गटसाधन केंद्रातील दहावी व बारावीच्या उत्तरपत्रिकास लागलेल्या आगीत उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या. या नंतर शिक्षण विभागास खडबडून जाग आल्याने शिक्षण विभागाने दहावी व बारावीच्या उत्तर पत्रिका आता सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस ठाण्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. गटसाधन केंद्रात तालुक्यातील दहावी व बारावीच्या परीक्षा केंद्रावर परिक्षार्थीनी दिलेल्या उत्तरपत्रिका जमा केल्यावर त्या उत्तरपत्रिकांना युआयडी लावल्या नंतर उत्तरपत्रिका सील करण्यात आल्या. या नंतर त्या उत्तरपत्रिका आता सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिस ठाण्याच्या कस्टडीत जमा करण्यात येणार आहेत. जमा केलेल्या उत्तरपत्रिका सकाळी पोस्टातून पाठविण्यात येणार असल्याचे कस्टोडियन सुनील केंद्रे यांनी सांगितले आहे. 

त्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा नाहीच..

बीडमधील केज येथील एकूण 1400 उत्तरपत्रिका जळाल्या आहेत. त्याप्रकरणी दोषींवर फौजदारी कारवाई करण्यात येईलच, शिवाय मंडळाकडूनही कारवाई करण्यात येईल. त्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेण्यात येणार नाही. मात्र मंडळाकडून विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यात येईल. विद्यार्थ्यांनी कुठलीही भीती न बाळगता पुढील पेपर द्यावे.  - शकुंतला काळे, अध्यक्षा. राज्य माध्य. व उच्च माध्य. शिक्षण मंडळ, पुणे.