होमपेज › Marathwada › कैर्‍या फोडण्यातून कामगारांना मिळतो 36 हजार प्रति महिना

कैर्‍या फोडण्यातून कामगारांना मिळतो 36 हजार प्रति महिना

Published On: Jun 04 2018 1:05AM | Last Updated: Jun 03 2018 11:50PMपरभणी : प्रतिनिधी

लोणचे तयार करण्यासाठी    कच्चे आंबे फोडून  दर महिन्याला 36 हजार रुपये मिळवणार्‍या कामगारांनी बेकारीवर मात केली आहे.  कामाच्या शोधात भटकंती करणारांची संख्या जास्त आहे. कौशल्यप्राप्त करून दीड महिन्यात अपेक्षित रोजगार मिळविणार्‍या  कैर्‍या फोडणार्‍या कारागिरांनी  वेगळा आदर्श निर्माण केला आहे.  

आंब्याचे दिवस अंतिम टप्यात आले आहेत. गावरान आंब्याचे लोणचे घालणे सुरू आहे. यासाठी चवीने आंबट व  कच्च्या गावरान आंब्याच्या कैरीचा वापर  होतो. हे आंबे फोडणे सोपे नसते. त्यासाठी कुशलता प्राप्त व्यक्तीकडूनच फोडल्या जातात. ग्रामीण भागात ही कामे साधारणतः सुतार आपल्या वाकसाच्या हत्याराने करतात. शहरातही नागरिक  गावरान आंब्याचे लोणचे घालत असल्याने या कच्च्या आंब्याची आवक  वाढली. ते खरेदी करून  कारागिरांकडून फोडून घेतल्या जात आहेत. यासाठी शहरातील गांधी पार्कात नागरिकांच्या रांगा लागताहेत. 15 ते 20 किलो  कैर्‍या फोडीचे काम दररोज होत आहे.  प्रति किलो 20 रुपये प्रमाणे कैर्‍या फोडण्याचा दर आकारला जात असून दिवसाअखेर एक कारागीर  60 किलो कैर्‍या फोडून देतो. त्यांना प्रतिदिन 1 हजार 200 रुपये मिळतात असे महिन्याला 36 हजार रुपयांची कमाई हे कामगार करतात.  हे कामगार  सकाळी 7 ते  सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे काम करत असल्याचे परभणी शहरात दिसते.