Tue, Jul 23, 2019 10:32होमपेज › Marathwada › विहिरींची कूदळ पडणार

विहिरींची कूदळ पडणार

Published On: Apr 07 2018 1:38AM | Last Updated: Apr 07 2018 12:43AMबीड : दिनेश गुळवे

रोजगार हमी योजनेतून मंजूर झालेल्या शेतकर्‍यांच्या विहिरीचे कामे केली जातात. दोन वषार्र्ंत जिल्ह्यात सहा हजार विहिरी करण्यात येणार आहेत. त्यानुसार यावर्षी सर्व तालुक्यांना विहिरींचे उद्दिष्ट देण्यात आले आहेत. बहुतांश विहिरी मंजूर झाल्या आहेत. या विहिरींची कुदळ याच महिन्यात पडणार आहे. यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून मजुरांनाही रोजगार मिळावा यासाठी कामे तत्काळ सुरू करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. 

ग्रामीण भागात मजुरांना रोजगार मिळावा यासाठी शेती कामे, जलसंधारणाची कामे, वनविभागाची कामे नरेगाअंतर्गत केली जातात. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत विहिरींही खोदल्या जातात. यासाठी शेतकर्‍यांना तीन लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. या योजनेमुळे शेतकर्‍यांना मोठा फायदा होत आहे. त्यामुळे आपणास विहीर मिळावी, यासाठी शेतकर्‍यांची धडपड असते. रोजगार हमी विहिरींसाठी दोन वषार्र्ंचे नियोजन करण्यात आले आहे. 2016-17  व 2017-18 या दोन वषार्र्ंमध्ये पाच हजार 900 विहिरी करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. यातील चालू वर्षासाठीचे जिल्ह्यातील त्या-त्या तालुक्यांना उद्दिष्ष्ट देण्यात आले आहे.

रोजगार हमी योजनेच्या विहिरी सुरू कराव्यात अशी जिल्हाभरातून मागणी होत आहे. आता शेतीची कामेही आटोपली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात मजुरांना कामे राहिलेली नाहीत. यामुळे ग्रामपंचायतकडूनही कामांची मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता रोजगार विहिरींचे कामे सुरू करण्यासाठी प्रशासनाने सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील काही पंचायत समितींचे अद्याप विहिरींना मंजुरी देण्याचे काम सुरू आहे.  ही प्रक्रिया प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. आता उन्हाळ्याचे केवळ दोन महिने शिल्लक आहेत. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत कामे व्हावयास हवीत. जूनमध्ये पाऊस सुरू होतो. तेव्हा कामे बंद असतात. त्यामुळे या दोन महिन्यांत काम सुरू होऊन विहीर पूर्ण होईल का? याची शेतकर्‍यांना चिंता आहे.

Tags : Marathwada, Work, wells, farmers, approved, Employment, Guarantee, Scheme, done