होमपेज › Marathwada › सावित्रीच्या लेकीची कुस्तीच्या आखाड्यात मुसंडी

सावित्रीच्या लेकीची कुस्तीच्या आखाड्यात मुसंडी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

आर्वी : जालिंदर नन्नवरे 

कुस्ती हा खेळ पुरुषांनी खेळायचा अणि कुस्त्याचा फड गाजवायचा हे जणू ठरलेलेच होते, परंतु मागील वर्षापासून महिलांनी देखील या कुस्तीच्या फडात जोरदार मुसंडी मारली असून कित्येक पुरुष मल्लाना फडातील धूळ चारतानाचे थराथरक चित्र सध्या ग्राहक भागातील यात्रेतील कुस्तीच्या फडात पाहण्यासाठी मिळत आहे. 

कुस्ती हा गावच्या मातीतला रांगडा खेळ. राज्यात कुस्तीचा खेळ चांगलाच लोकप्रिय आहे. गावोगावच्या यात्रा, जत्रांमध्ये कुस्त्याचा फड आयोजित केला जातो. पंचक्रोशीतील मल्ल या ठिकाणी आपली ताकद दाखवत प्रतिस्पर्ध्याला आस्मान दाखवतात, परंतु आता बदलत्या काळात कुस्तीचा फ ड महिला, मुलीही गाजवताना दिसत आहेत. पालकही मुलींना कुस्ती खेळासाठी प्रोत्साहन देत असून या खेळाकडे करिअर म्हणूनही पाहिले जाऊ लागले आहे.

शिरूर तालुक्यातील तिंतरवणी येथे हनुमान जयंती निमित्ताने जत्रेचे आयोजन ग्रामस्थांकडून करण्यात आले होते. या जत्रेत कुस्त्याचेही आयोजन झाले होते. कुस्त्याचा हंगाम रंगात आलेला असताना अचानक दोन मुलींनी मैदानावर एंट्री घेतली आणि आपल्यातील कसब दाखवत उपस्थितांना थक्क केले.  तिंतरवणीसारख्या ग्रामीण भागात मुलींना कुस्तीचे प्रशिक्षण देऊन मैदानात उतरवले गेल्याने याची चर्चा होत आहे.

प्रशिक्षणाची अडचण

गावोगावी पहेलवानांसाठी तालमी, व्यायामशाळा उभारण्यात आलेल्या आहेत. अनेक मोठ्या शहरांमध्ये कुस्ती प्रशिक्षण केंद्रेही आहेत, परंतु मुलींसाठीचे प्रशिक्षण केंद्र जवळपास नसल्याने अडचणी येत आहेत. मुलींसाठी कुस्तीचे प्रशिक्षण देणारे केंद्र सुरू झाल्यास ग्रामीण भागातील मुली या खेळात नक्कीच यश मिळवू शकतील.

 

Tags : Shirur, Shirur news, titravani, Women wrestling,


  •