Sun, Nov 18, 2018 01:11होमपेज › Marathwada › रस्ता नसल्याने अंत्यविधीचा नाल्यातून काढावा लागतो मार्ग

रस्ता नसल्याने अंत्यविधीचा नाल्यातून काढावा लागतो मार्ग

Published On: Mar 05 2018 1:43AM | Last Updated: Mar 05 2018 1:21AMगेवराई : प्रतिनिधी

शहरालगत लिंगायत गवळी समाजाची स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने अंत्यविधीसाठी नाल्यातील पाण्यातून वाट काढत जावे लागते. 

शहरालगत लिंगायत गवळी समाजासाठीच्या स्मशान भूमीमध्ये अंत्यविधीसाठी जाताना नागरिकांना मागील अनेक वर्षांपासून तारेवरची कसरत करावी लागत आहे. लिंगायत गवळी समाजाने प्रशासनाला अनेक वेळा निवेदने देऊन रस्त्याची मागणी केली, परंतु त्या निवेदनाकडे दुर्लक्ष झाल्याचे लिंगायत गवळी समाजबांधवांचे म्हणणे आहे.  

अंतविधीसाठी जाताना नाल्यातील पाण्यातूनच मार्ग काढत स्मशान भूमीपर्यंत जावे लागत आहे. वृद्ध नागरिक व खांदेकरी यांना नाल्यातून जावे लागत असल्याने हाल होत आहेत.  रस्ता करण्यात यावा या मागणीचे निवेदन लिंगायत गवळी समाजबांधवांनी प्रशासनाला दिले आहे. यासाठी आंदोलन करण्याचा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे.