Wed, May 22, 2019 14:19होमपेज › Marathwada › प्लास्टिकसोबत आता... इलेक्ट्रॉनिक कचर्‍याची भर

प्लास्टिकसोबत आता... इलेक्ट्रॉनिक कचर्‍याची भर

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बीड : शिरीष शिंदे

जिल्ह्यात प्लास्टिक कचरा वाढत असून त्याला नष्ट करण्यासाठी  नगर पालिकांच्या नाकीनऊ येत आहेत. त्यात इलेक्ट्रानिक कचर्‍याची भर पडली असून मागच्या पाच वर्षांच्या तुलनेत त्यात दुपटीने वाढ झाली आहे. निकामी झालेले मोबाइल, कॉम्प्युटर व कि-बोर्ड रिसायकल (पुनर्निर्मित) होत असले तरी बहुतांश ई-कचरा हा कायम रहात असल्याने तो नष्ट होण्याऐवजी इतरत्र पडलेला असतो. पुढील काळात ई-कचरा मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने शासनाने आतापासून त्याचे नियोजन करणे काळाची गरज बनली आहे. 

2000 ते 2010 या कालावधीत मोबाइलची क्रांती झाली अन् प्रत्येकाच्या हातात मोबाइल दिसू लागला. पूर्वी मोबाइल हा स्टेट्स सिम्बॉल होता, नंतरच्या कालावधीत मात्र हे आवश्यक साधन बनले. मोबाईल हॅन्डसेटच्या किमती कमी झाल्या त्यामुळे सर्वांच्या हातात मोबाईल दिसू लागले. सिम कार्ड कंपन्यांनही कॉल दर कमी केले. त्यामुळे एका मोबाइल क्रांतीची लाट निर्माण झाली. मोबाइल हॅन्डसेटमध्ये नवनवीन सुविधा येत असल्याने जुना मोबाइल विक्रीस काढून नवीन मोबाईल घेण्याचा ट्रेंड हल्‍ली वाढला आहे मोबाइलचे आयुष्य देखील कमी होत आहे. त्यानंतर तो मोबाइल निकामी होत असल्याने फे कून देण्यात येतो. जुने किंवा कालबाह्य झालेले हजारो मोबाइल फेकून दिले जात आहे. त्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. ही अत्यंत गंभीर समस्या बनली आहे. कॅरिबॅग जाळणे शक्य आहे, मात्र मोठे प्लास्टिक भंगार व्यवस्थीत जाळता येत नसल्याने जमिनीत ते पडून राहिले तर त्याचे परिणाम पुढील कालावधीत दिसून येतील. 

निकामी वस्तुंचे संकट, नियोजन करणे गरजेचे

बंद मोबाइलची समस्या गंभीर

स्मार्टफोनमध्ये नवेनवे फि चर्स येत असल्यामुळे जुने मोबाइल विकून नवीन मोबाइल खरेदी करण्याचा ट्रेंड तरुणांमध्ये दिसून येतो. निश्‍चित कालावधी झाल्यावर मोबाइल बंद पडतात. ते मोबाइल कचर्‍यात किंवा भंगारात विक्री केले जातात. मोबाइल कचर्‍या पडून राहिले तर मोबाइलच्या बॅटरीमधील रसायन जमिनीत जाते त्याचा   आरोग्यवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दुपटीने वाढ

2007 ते 2012 या कावधीत मध्ये बीड जिल्ह्यात जवळपास एक हजार टन ई-कचरा गोळा होत होता. त्यात आता दुपटीने वाढ झाली आहे. 2012 ते 2018 दरम्यानच्या कालावधीत दोन हजार टन ई-कचरा गोळा होऊ लागला असल्याची माहिती भंगार विके्रते कलीम पठाण यांनी सांगितले. घरगुती इलेक्ट्रानिक वस्तू पेक्षा मोबाइल-किबोर्ड-कॉप्युटर साहित्य मोठ्या प्रमाणात भंगार गोळा करताना मिळत असल्याचेही ते म्हणाले.

पुणे-मुंबईत होते रिसायकल

बीड शहरातील भंगार विक्रेत शेख नझीर म्हणाले की, बीड जिल्ह्यातून गोळा होणारे ईलेक्ट्रिक साहित्य जसे की, मोबाइल डिव्हाईस, कॉम्प्युटर स्क्रिन, कि-बोर्ड, माऊस, हेडफ ोन, कॉप्युटर वायर आदी साहित्य भंगात गोळा केले जाते. घरगुती इलेक्ट्रॉनिकच्या वापरात नसलेल्या वस्तू-पंखा, वॉशिंग मशीन, वायर, शीतकपाट यांचा इलेक्ट्रॉनिक कचर्‍यात समावेश होतो, मात्र मोबाइल, बंद कॉप्युटर व साहित्य कचरा अधिक गोळा होतो. त्याचे वर्गीकरण करून मुंबई-पुणे या ठिकाणी रिसायकलसाठी पाठविले जाते, मात्र काही निकामी ई-साहित्य विक्री करता येत नाही. त्यामुळे फे कून दिले जाते किंवा नगर पालिकेस दिले जाते. 

सोने काढण्याचीही प्रक्रिया...

सोने हा धातू ईलेक्ट्रिक वस्तुमध्ये अगदी योग्य प्रकारे संदेश वहनाच काम करतो. त्यामुळे कॉप्युटरच्या मदर बोर्डमध्ये सोन्याचा वापर काही प्रमाणात केला जातो. कॉप्युटर भंगारात काढल्यावर मदरबोर्डही रिसायकलसाठी पाठविले जातात. रासायनिक प्रक्रिया करून मदरबोर्डच्या चीपमधून सोने वेगळे केले जाते, मात्र ही प्रक्रिया अत्यंत जहाल व तीव्र स्वरुपाचे केमिकल वापरून केले जात असून घातक असते.

विल्हेवाट लावण्याची सुविधा उपलब्ध नाही...

ई-कचर्‍याच्या विल्हेवाटीचे तंत्रच फारसे प्रगत नाही. ई-कचर्‍याच्या समस्येने उग्र रूप घेतल्यावर त्याबाबत नियमावली 2011 मध्ये आली होती. 2012 मध्ये त्याची अंमलबजावणी सुरू झाली. मात्र अजूनही जिल्ह्यातील नगर पालिकांमध्ये ई-कचर्‍याच्या विल्हेवाटीबाबत योग्य यंत्रणा नाही. 60 टक्के इलेक्ट्रॉनिक कचर्‍याचा पुनर्वापर शक्य असतो, मात्र संकलन व्यवस्थित व नियमित होत नसल्यामुळे हजारो टन कचरा इतर कचर्‍यासोबत डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकला जातो.

 

Tags : Beed, Beed news, Plastic, electronic waste,


  •