होमपेज › Marathwada › पत्नीचा खून; पतीस जन्मठेप 

पत्नीचा खून; पतीस जन्मठेप 

Published On: May 25 2018 1:10AM | Last Updated: May 24 2018 11:13PMबीड : प्रतिनिधी 

क्षुल्लक कारणावरून पत्नीचा खून केल्या प्रकरणी पती विश्वास मुरलीधर गायकवाड यास जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. बी.व्ही. वाघ यांनी जन्मठेपीची शिक्षा गुररुवारी (दि.24) सुनावली. आष्टी तालुक्यातील अंभोरा येथील विश्वास मुरलीधर गायकवाड व त्यांची पत्नी राणी यांच्यात क्षुल्‍लक कारणावरुन वाद झाल्याने 16 नोव्हेंबर 2015 रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास विश्‍वास याने पत्नीला लाकडाच्या दांड्याने डोक्यात जबर मारहाण करून जखमी केले होते.

राणीच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी राणीचा भाऊ सचिन आढाव याच्या फिर्यादीवरून अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अंभोरा पोलिस ठाण्याचे तत्कालिन सहायक पोलिस निरिक्षक गुरमे यांनी तपास करून आरोपी विरोधात न्यायालायात दोषारोप पत्र दाखल केले होते. जिल्हा सरकारी वकील अजय राख यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी विश्वास मुरलीधर गायकवाड यास जन्मठेपेची शिक्षा व 50 हजार रुपये दंड ठोठावला.