Thu, Apr 25, 2019 07:25होमपेज › Marathwada › नांदेडमध्ये पत्‍नीनेच केला पतीचा खून 

नांदेडमध्ये पत्‍नीनेच केला पतीचा खून 

Published On: Feb 24 2018 6:09PM | Last Updated: Feb 24 2018 6:18PMनांदेड : पुढारी ऑनलाईन

शहरातील नागसेननगर भागात पत्नीनेच पतीचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली. आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही बाब उघडकीस आली. शाम नारायण सरपे असे मृताचे नाव असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नागसेननगर परिसरात शाम उर्फ शिवाजी नारायण सरपे हे पत्नी पूनम सोबत राहत होते. आज दुपारी सरपे पती-पत्नीत काही कारणांवरून वाद झाला. यावेळी शाम आणि पूनम यांच्यात झटापट झाली. यात शाम याच्या छातीत चाकूचा मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पूनमला ताब्यात घेतले असून जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. 

मी वाचविण्याचा प्रयत्न केला : पूनम

आमच्यात वाद झाल्यानंतर शाम स्वतःस चाकू मारून घेत होते, तेव्हा आपण त्यांना वाचविण्यासाठी चाकू पकडला, असे पूनमने पोलिसांना सांगितले. दरम्यान, पूनम दोन महिन्याची गर्भवती असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे.