Thu, Jun 20, 2019 00:43होमपेज › Marathwada › इमामपूर ग्रामपंचायतीच्यावतीने मुलीच्या जन्माच स्वागत

इमामपूर ग्रामपंचायतीच्यावतीने मुलीच्या जन्माच स्वागत

Published On: Jan 29 2018 1:41AM | Last Updated: Jan 29 2018 12:24AMबीड : प्रतिनिधी

इमामपूर ग्रामपंचायतीच्या वतीने 2017 वर्षात जन्मलेल्या 12 मुलींच्या नावे प्रत्येकी एक हजार रुपये मुदत ठेव करून त्यांच्या आईवडिलांचे ग्रामपंचायतच्या वतीने स्वागत करण्यात आले. 

जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी शासनस्तरावर विविध उपक्रम सुरू आहेत. नागरिकांनीही यात पुढाकार घेऊन मुलगी नको ही मानसिकता सोडणे आवश्यक आहे. स्त्री जन्माचे स्वागत करण्यासाठी इमामपूर ग्रामपंचायतीने राबविलेला उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील भोकरे यांनी केले. 

सरपंच वैजनाथ नेवाळे, ग्रामसेवक भाऊसाहेब मिसाळ, शाहिनाथ साळुंके, चंद्रसेन चव्हाण, अशोक जोजारे, अनिता दत्ता कदम, सुषमा कृष्णा डबडे, वैशाली किशोर पिंपळे, गायत्री थोरात उपस्थित होते. 

मंदा सोळंके यांनी स्त्रियांचे समाजातील स्थान याविषयी विचार मांडले. उध्दव कदम, बापूराव चव्हाण, अप्पा कदम, आबा कदम, महेश चव्हाण, रमेश थोरात, कृष्णा डबडे, बजरंग रगडे, भीमराव कदम, अ‍ॅड. ज्ञानेश्‍वर मस्के, राहुल तौर, मसुराम कदम, डबडे फौजी, वृंदावनी रगडे, तसेच शाळा समिती सदस्य, महिला बचत गटाच्या सदस्या, नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन ग्रामसेवक भाऊसाहेब मिसाळ यांनी तर आभार सरपंच वैजिनाथ नेवाळे, बापूराव चव्हाण यांनी केले.