Wed, Apr 01, 2020 07:29होमपेज › Marathwada › परभणी : चक्क स्मशानभूमीत लग्न सोहळा 

परभणी : चक्क स्मशानभूमीत लग्न सोहळा 

Last Updated: Feb 27 2020 5:34PM
जिंतूर (परभणी) : पुढारी वृत्तसेवा 

सध्या समाजामध्ये समशानभूमी संदर्भात अंधश्रद्धा पसरलेली आहे. या अंधश्रद्धेला वाचा फोडण्यासाठी जिंतूर येथे जाधव परिवाराने आपल्या नातेवाईकचा लग्न समारंभच स्मशानभूमीत पार पाडला. शहरातील सार्वजनिक समशान भूमीमध्ये आज विठ्ठल जाधव यांची कन्या सोमित्रा हिचे विवाह गणेश गायकवाड यांचे चिरंजीव गोविंदा यांच्यासोबत लावण्यात आला. या आगळ्यावेगळ्या लग्नात शहरातील नागरिकांनी उपस्थिती लावली होती. यामध्ये जिंतूर पोलिस स्टेशनचे दामिनी पथक प्रमुख संगीता वाघमारे व त्यांची महिला दक्षता समिती यांनी पुढाकार घेतला. यावेळी अनुजा तळणीकर, कविता घनसावंत, राजश्री देबाजे, आशा खिल्लारे, सुमित्रा मुकाडे, शेवंता प्रधान, बबलू भाई, पत्रकार बाळु काजळे आदींची उपस्थिती होती.

जाधव परिवाराने आपल्या कन्येचा विवाह सोहळा चक्क शहरातील स्मशानभूमीत घेऊन अंधश्रद्धा विषयी जनजागृती राबवून एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केल्याने जाधव परिवाचे सर्वत्र कौतुक होत आहे.