Tue, May 30, 2017 04:06
29°C
  Breaking News  


होमपेज › Marathwada › अंबाजोगाई येथील प्रकार 

पाकिस्तानी हॅकर्सकडून  वेबसाईट हॅक

By pudhari | Publish Date: May 19 2017 3:25PM

स्क्रीन शॉटवर  झळकली   पाकिस्तान झिंदाबादची घोषणा 


अंबाजोगाई  :  प्रतिनिधी

नोकर भरतीचे  ऑनलाईन  अर्ज  भरत असताना  नॅशनल फर्टिलायझर्स डॉट कॉम  या वेबसाईटवर  गुरुवारी दुपारी  पाकिस्तानी हॅकर्सकडून ही वेबसाईट हॅक करण्यात आली. स्क्रीनवर पाकिस्तान झिंदाबादची घोषणा दिसू लागली व संगणक पूर्णपणे बंद पडले. हा प्रकार अंबाजोगाई येथे घडला.  या प्रकारामुळे अंबाजोगाई शहरातील संगणक चालकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
 बी. एस्सी . अ‍ॅग्री झालेल्या पदवीधरांसाठी नॅशनल फर्टिलायझर्स डॉट कॉम या वेबसाईटवर विविध पदांच्या जागा भरण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू आहे. या जागा भरतीप्रक्रियेसाठी गुरुवारी दुपारी युवकांनी मोठी गर्दी केली होती. दुपारी २ च्या सुमारास अचानक पाकिस्तानी हॅकर्सनी ही वेबसाईट हॅक केली.  संगणकाच्या स्क्रीनवर ‘पाक सायबर अ‍ॅटॅकर्स, वुई आर लिंजड. पाकिस्तान झिंदाबाद’ हा मजकूर प्रसिद्ध झाला. संपूर्ण हिरव्या रंगाच्या  झळाळीमध्ये काळ्या शाईने ही अक्षरे प्रसिद्ध झाली आहेत. ही वेबसाईट हॅकर बाय फैजल असा संदेशही त्या स्क्रीनशॉटवर उपलब्ध झाला आहे. 
सर्वत्र वेबसाईट हॅक केल्या जात आहेत. अशी चर्चा गेल्या आठवडाभरापासून सोशल मीडियावर विविध मेसेजच्या माध्यमातून कळविली जात आहे. त्यातच अंबाजोगाईत हा प्रकार  घडला आहे.