Tue, Apr 23, 2019 00:10होमपेज › Marathwada › जिल्ह्यातील पाणीपट्टी वसुली पन्नास टक्क्यांहून कमी

जिल्ह्यातील पाणीपट्टी वसुली पन्नास टक्क्यांहून कमी

Published On: May 16 2018 1:38AM | Last Updated: May 16 2018 1:38AMबीड : शिरीष शिंदे

जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायतीचा आर्थिक स्त्रोत हा केवळ कर असतो. मोठ्या प्रमाणत कर वसुली झाली तरच या दोन्ही संस्थेचा गाडा सुरळीत चालू शकतो, तसेच नागरिकांना मूलभूत सुविधाही दिल्या जाऊ शकतात, मात्र एप्रिल 2017 ते मार्च 2018 या वर्षत पाणीपट्टी वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यात जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायतीना अपयश आले आहे. सदरील आर्थिक वर्षात 46.22 टक्के पाणीपट्टी वसुली झाली असून 17.58 कोटी रुपयांपैकी 8.12 कोटी रुपयेच त्यांना मिळाले आहेत.

बीड जिल्ह्यात 11 नगर परिषद व नगर पंयाचती आहेत. कर वसुली संदर्भाने मुख्याधिकार्‍यांच्या उपस्थितीत बैठका होऊन वारंवार कर्मचार्‍यांना सूचना दिल्या जातात. विशेष म्हणजे जानेवारी ते मार्च या महिन्यात कारवाईला वेग येतो. या वर्षी कारवाई झाली, मात्र वसुली झाली नसल्याचे समोर आले आहे. अशीच परिस्थिती कायम राहिली तर पाण्यासाठी करण्यात येणार्‍या योजना पूर्ण होणे शक्य नाही, दरम्यान वीज बिल थकीत असल्याने अनेक वेळा बीड नगर पालिकेचा विद्युतपुरवठा महावितरणेने कापलेला आहे.

वेळेवर पाणी न मिळाल्याने नागरिकांचे हाल होतात. ज्या लोकांनी पाणी करापोटी पैसे भरले आहेत त्यांनाही पाणी कपातीचा त्रास सहन करवा लागतो. त्यामुळे नियमितपणे पाणीपट्टी वसुली होणे आवश्यक आहे. पाणी शुद्धीकरण, मुख्य पाइपलाइनवरील लिकेजेस, शहरात नवीन पाइपलाइन अंथरणे, हद्दवाढीतील भागांंमध्ये नव्याने पाइपलाइन देणे अशी विविध कामे करातून जमा झालेल्या पैशातून केली जातात. पाणीपट्टी कर कमी वसूल झाल्याने इतर खात्याचा कर पाणी योजनांसाठी वापरला जातो. मुळात कर भरणे ही सर्वांची जबाबदारी आहे. सर्वांनी पुढाकार घेतला तरच शहराच्या विकास भर पडणार आहे. वसुली मंदावल्याचा परिणाम शहरात विविध माध्यमातून नियमितपणे दिसून येतो.