Tue, Nov 13, 2018 06:30होमपेज › Marathwada › वालसा वडाळा गावाला मिळाले पाण्याचे टँकर

वालसा वडाळा गावाला मिळाले पाण्याचे टँकर

Published On: Mar 23 2018 1:58AM | Last Updated: Mar 23 2018 1:14AMमाहोरा : प्रतिनिधी 

भोकरदन तालुक्यातील वालसा वडाळा गावात सुरू असलेल्या पाणी टंचाईचे वृत्त दैनिक पुढारीत प्रकाशित होताच, त्याची दखल घेत प्रशासनाच्या वतीने पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहे.

वालसा वडाळा गावात गेल्या डिसेंबर महिन्यापासून पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. गावाला पाणीपुरवठा करणार्‍या विहिरींनी तळ गाठले होते. वालसा गावाची लोक संख्या सहा हजारांच्या आसपास असल्याने या ठिकांनी भीषण पाणी टंचाई निर्माण झाली होती. महिलांना कोसो दूर उन्हा तान्हात पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. 

या बात दैनिक पुढारीने वेळोवेळी प्रकाश टाकल्यानंतर प्रशासनाला जाग आली. प्रशासनाच्या वतीने अखेर या गावात टँकरला मंजुरी देण्यात आली. गुरुवार दोन टँकर गावात येताच गावकर्‍यांनी या टँकरची पूजा करून त्यातील पाणी सार्वजनिक विहिरीत टाकले. हे पाणी नळाद्वारे गावाला पुरवठा करण्यात येणार असून या मुळे पाणी वाया जाणार नाही, तसेच भांडणे  होणार नाही. असे  नियोजन ग्रामपंचायत मार्फत करण्यात आले आहे.