Sun, Nov 18, 2018 19:47होमपेज › Marathwada › कुरुंद्यात जलसंकट

कुरुंद्यात जलसंकट

Published On: Mar 13 2018 1:42AM | Last Updated: Mar 12 2018 10:18PMकुरुंदा : प्रतिनिधी

वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून ग्रामपंचायतच्या वतीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. नियोजनाअभावी पाणी ग्रामस्थांना मिळत नसल्याने उन्हाळ्याच्या सुरुवातीस पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करण्याची वेळ येत आहे. 

भल्या  पहाटेपासून पाण्यासाठी उभे राहण्याची वेळ महिलांसह मुलांवर आली आहे.वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे उन्हाळयाच्या सुरुवातीस तीव्र पाणीटंचाई भासत आहे. ग्रामपंचायतद्वारा पाणीटंचाई भासत असलेल्या भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा केल्या जात आहे. पूर्ण गावात पाणीटंचाई आहे. 

 सध्या गणेशनगर भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. काही नागरिकांना महिन्याकाठी मोठी रक्‍कम मोजून पाणी घ्यावे लागत आहे. तालुक्यात सर्वांत मोठे गाव कुरुंदा आहे. प्रशासनाने पाणी टंचाई प्रश्न दूर करण्यासाठी जास्तीचे अधिग्रहण व नवीन बोअरची मंजुरी देऊन कुरुंदा ग्रामस्थांचे हाल दूर करावे. टँकरद्वारे पाण्याच्या टाक्यात पाणी टाकून ग्रामस्थांची व्यवस्था केल्यास थोड्या प्रमाणात का होईना नागरिकांचे हाल थांबतील असे मत ग्रामस्थ व्यक्‍त करीत आहेत.