Mon, Apr 22, 2019 12:03होमपेज › Marathwada › वृक्षलागवडीवर सॅटेलाईटद्वारे वॉच

वृक्षलागवडीवर सॅटेलाईटद्वारे वॉच

Published On: May 11 2018 1:39AM | Last Updated: May 11 2018 12:42AMशिरूर कासार : जालिंदर नन्नवरे 

सरकारच्या वनयुक्त शिवार योजनेतून यावर्षीच्या 1 ते 31 जुलै या  कालावधी होणार्‍या वृक्ष लागवड अभियानावर शासन सॅटेलाईटद्वारे वॉच ठेवला जाणार आहे. वृक्ष रोपणापूर्वीचे खड्डे आणि वृक्ष रोपणानंतरची रोपे आदीं बाबींचा दर तीन महिन्याला आढावा घेतला जाणार असून त्याची ऑनलाइन माहिती शासनाकडे पाठवावी लागणार आहे. यामुळे कागदोपत्री घोडे अधिकार्‍यांनी चांगलीच दमछाक होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर मनगंटीवार यांनी राज्य शासनाच्या ड्रीम प्रोजेक्टच्या माध्यमातून पाच वर्षांत 50 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार आगामी जुलै महिन्यात 13 कोटी वृक्ष लागवड योजनेचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. या कृती आरखाड्यानुसार यंत्रणेची तयारी देखील मोठ्या जोमात चालली आहे. वनविभाग व सामाजिक वनीकरणासह इतर प्रमुख विभागाच्या शासकीय प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांना वृक्ष लागवड, संर्वधनाच्या बाबतीत प्रशिक्षण कार्यक्रमही राबण्यात आला आहे.

शतकोटी वृक्ष लागवड योजनेत मागील तीन वर्षांत केवळ यंत्रणेकडून कागदी घोडे नाचवल्याचा प्रकार घडला असून केवळ बोटावर मोजण्याइतपत झाडे जगल्याच्या तक्रारी आहेत. शासनाच्या योजनांचा आढावा घेऊन ही योजना कागदोपत्री असू नये यासाठी वृक्ष रोपणाचे स्थळ, छायाचित्र, सर्वे क्रमांक, गावाचे नाव, वृक्ष प्रजाती यासह लागवड यंत्रणेचे नाव आदी माहिती शासनाला द्यावी लागणार आहे. त्यामुळे वृक्ष लागवडीच्या पूर्वी नंतर शासनाला त्यावर सॅटेलाईटद्वारे नजर ठेवणे सोपे जाणार आहे. 

लपवाछपवीला बसणार चाप

या मोहिमची माहिती पाठवताना यंत्रणेला लपवाछपवी करता येणार नसून खड्डे तयार होताच ऑनलाइन माहिती अपलोड करावी लागणार आहे. वृक्ष लागवडीचा प्राप्त संपूर्ण डेटा सॅटेलाईटला जोडली जाणार असल्याने शासकीय यंत्रणेला यावर नियंत्रण ठेवणे सहज होणार आहे.यामुळे लागवडीतील सहभागी अधिकार्‍यांना व कर्मचार्‍यांना दक्ष रहावे लागणार आहे.