होमपेज › Marathwada › अन् ६ एकरातील कलिंगडावर फिरवला ट्रॅक्‍टर (video)

अन् ६ एकरातील कलिंगडावर फिरवला ट्रॅक्‍टर (video)

Last Updated: May 29 2020 4:16PM
वाशिम : पुढारी ऑनलाईन 

कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी देशभरात पुकारलेल्‍या लॉकडाऊनचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्‍टात पिकवलेला फळ, भाजीपाला हा जिल्‍ह्याच्या सीमा बंद असल्‍याने बाहेर जाऊ शकत नाही. त्‍यातच मार्केट बंद असल्‍याने आणि ग्राहाकांविना शेतमाल खराब होत आहे. अशीच एक घटना वाशिम मधील झाकलवाडी येथील शेतकऱ्यावर आली आहे. बाजार बंद असल्‍याने आणि ग्राहक मिळत नसल्‍याने या शेतकऱ्यावर आपल्‍या सहा एकरातील कलिंगडावर ट्रॅक्‍टर फिरवण्याची वेळ आली. यामध्ये या शेतकऱ्याचे सुमारे १४ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. 

बाजारात ग्राहक मिळत नसल्यामुळे वाशिम जिल्ह्यातील झाकलवाडी येथील रामकीसन काळबांडे यांनी सहा एकरातील कलिंगडावर ट्रॅक्टर फिरविला आहे. त्यामुळं त्यांचं 14 लाख रूपयांचे नुकसान झाले असून, लागवडीसाठी घेतलेलं कर्ज फिटणार नसल्याने शेतकऱ्यांवर मोठं संकट आले आहे. जिल्हा प्रशासनाने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.