Thu, Jun 27, 2019 17:47होमपेज › Marathwada › खा. राजू शेट्टींची पेठशिवणीस भेट

खा. राजू शेट्टींची पेठशिवणीस भेट

Published On: May 10 2018 1:37AM | Last Updated: May 09 2018 10:28PMपालम : प्रतिनिधी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी दि. 8 मे रोजी नांदेडहून गंगाखेडकडे जात असताना पेठशिवणी येथे भेट देऊन शेतकरी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. खा. शेट्टी हे मंगळवारी मसला (ता. गंगाखेड) येथे कार्यक्रमासाठी जात होते. दरम्यान त्यांनी पेठशिवणी येथे धावती भेट देत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकर्‍यांनी पीकविमा, बोंडअळी, गारपीट आदींची भरपाई मिळाली नसल्याचे सांगितले. यावेळी पीकविमा कंपनीने मनमानी करत शेतकर्‍यांची फसवणूक केल्याने शेतकरी विम्यापासून वंचित राहिल्याचे सांगितले. याप्रश्‍नी लक्ष घालण्याची विनंतीही शेतकर्‍यांनी त्यांच्याकडे केली.

यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने शेतकर्‍यांना पीकविमा मिळण्यासाठी निवेदन सादर केले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वसंतराव सिरस्कर, उपसभापती रत्नाकर शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल कराळे, बापूराव कराळे, शिवाजी पाटील कराळे, तुकाराम कराळे, हनूमंतराव कराळे, बालाजी बरडे, नागोराळ कराळे, एकनाथ शेटे यांच्यासह  शेतकर्‍यांची उपस्थिती होती.