होमपेज › Marathwada › आ.जयदत्त क्षीरसागर भुजबळांच्या भेटीला

आ.जयदत्त क्षीरसागर भुजबळांच्या भेटीला

Published On: May 12 2018 1:30AM | Last Updated: May 12 2018 12:19AMबीड : प्रतिनिधी

आ. जयदत्त क्षीरसागर यांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. तासभराच्या चर्चेत दोघांनी विविध विषयांवर गप्पा मारल्या. ‘प्रकृतीची काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा ’ अशा सदिच्छा देत क्षीरसागर यांनी त्यांचा निरोप घेतला. 

मुंबईतील निवासस्थानी आ. जयदत्त क्षीरसागर यांनी शुक्रवारी दुपारी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. यावेळी क्षीरसागर यांनी भुजबळांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. त्यांच्या आजाराविषयी जाणून घेत डॉक्टरांकडून झालेल्या उपचाराची माहिती घेतली. दोघांमध्ये तासभर चर्चा झाली. राज्याच्या राजकारणातील दोन दिग्गज ओबीसी नेते म्हणून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि आ. जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे पाहिले जाते.