होमपेज › Marathwada › विष्णूच्या स्वप्नांना मिळाले पाठबळ

विष्णूच्या स्वप्नांना मिळाले पाठबळ

Published On: Apr 24 2018 1:06AM | Last Updated: Apr 23 2018 11:25PMपरभणी : प्रतिनिधी

गेली दोन वर्षे जमीन मार्गाने विश्‍वपरिक्रमा करत असलेले परभणी जिल्ह्यातील कात्नेश्‍वर येथील रहिवासी व इंग्रजी मीडियात कार्यरत पत्रकार विष्णूदास चापके यांच्या स्वप्नांना रतन टाटा अध्यक्ष असलेल्या टाटा ट्रस्टने तब्बल 15 लाख रुपये मदत केली आहे. यानिमित्ताने त्यांनी सामाजिक दातृत्वाचा परिपाठ जगापुढे ठेवला आहे.सध्या मध्य अमेरिकेतील एल साल्व्हाडोर या देशात असलेल्या विष्णूदास चापके यांनी टाटा ट्रस्टकडून त्यांना दोन टप्प्यांमध्ये 15 लाख रुपयांचे योगदान प्राप्त झाल्याचे कृतज्ञतापूर्वक नमूद केले आहे. टाटांच्या मदतीमुळे ते यापुढेही आपली परिक्रमा सुरू ठेवून येत्या वर्षभरात पूर्ण करू शकू, असा विश्‍वास चापके यांनी व्यक्त केला. मराठवाड्यातील कात्नेश्‍वर येथील शेतकरी असलेले विष्णूदास यांचे वडील मुलाच्या स्वप्नपूर्तीसाठी आपली शेतजमीन विकायला तयार झाले होते. 

टाटांच्या या दातृत्वामुळे तसे करण्याची त्यांना सध्या आवश्यकता राहिली नाही. मार्च 2016 साली कलकत्त्याहून नागालॅण्ड मार्गे विष्णूदास यांनी आपली भूपरिक्रमा सुरू केली होती. त्यानंतर म्यानमार, थायलंड, लाओस,  चीन, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, चिली, पेरू, निकारगुवा, बोलिव्हिया, कॉस्तारिका, होण्डुरस मार्गे साल्व्हाडोर या देशांमध्ये राहून त्यांनी तेथील लोकजीवनाचा अभ्यास केला. मध्य अमेरिकेनंतर ते भूमार्गाने या देशांमध्ये जाणार आहेत. भूमार्गे विश्‍वपरिक्रमा करणारा विष्णुदास पहिला भारतीय ठरणार आहे.

Tags : Marathwada, Vishnus, dreams, support