Tue, May 21, 2019 00:17होमपेज › Marathwada › मुदगल : विशाल घोडके यांचा सामाजिक उपक्रम

स्वखर्चातून लावले ३ विवाह

Published On: May 28 2018 1:52AM | Last Updated: May 27 2018 10:45PMपरभणी : प्रतिनिधी

येथे 27 मे रोजी पायल विशाल सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष विशाल  घोडके, सचिव मनीषा विशाल घोडके यांनी स्वखर्चाने तीन विवाह लावून दिले. या सामाजिक उपक्रमाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

तिन्ही वधू-वरांस संसार उपयोगी साहित्य, मणीमंगळसूत्र देण्यात आले. 1 हजार वर्‍हाडींची भोजन व्यवस्था विशाल घोडके यांनी केली होती. विशेष म्हणजे घोडके यांना कोणतीही मदत इतर लोकांनी केली नाही. त्यांच्या घरी काही शेती नाही, कोणता उद्योग नाही. कोणाचा सहारा नसताना घोडके यांनी तीन विवाह स्वखर्चातून लावले आहेत. 

यावेळी सरपंच लक्ष्मण केंद्रे, बळीराम नवघरे, लक्ष्मीकांत तिडके, राजेभाऊ गवळे, ग्रामसेवक मादनकर, पोलिस पाटील रामकिशन घोडके, उपसरपंच राजेश घोडके यांच्यासह मोठ्या संख्येने पाहुणे मंडळी उपस्थित होती.

या उपक्रमाविषयी विशाल घोडके यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, मला बहीण नाही. या माझ्या बहिणी म्हणून मी यावर्षीपासून दरवर्षी पाच-दहा विवाह पार पाडणार आहे.