Tue, Jul 23, 2019 11:02होमपेज › Marathwada › वांगी ग्रामस्थांनी पकडला गायींचा टेम्पो

वांगी ग्रामस्थांनी पकडला गायींचा टेम्पो

Published On: Feb 07 2018 1:34AM | Last Updated: Feb 07 2018 12:33AMपरभणी : प्रतिनिधी 

वांगी ग्रामस्थांनी वांगीवरून परभणीकडे गायी घेऊन येणारा टेम्पो पकडून मोंढा पोलिसांच्या स्वाधीन केला. तसेच टेम्पोचालकासह दोन जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

6 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 च्या सुमारास  वसमतकडून मधल्या रस्त्याने वांगीवरून परभणीकडे येणारा आयशर टेम्पो (क्र. एच.एच.14  ए.एस.7663 ) युवकांनी संशयावरून अडवला. यात गायी असल्याचे निदर्शनास येताच वांगी येथील गावकर्‍यांनी टेम्पो चालकाकडे याबाबत विचारपूस केली, मात्र टेम्पो चालकाकडून उडाउडवीची उत्तरे देण्यात आल्याने ग्रामस्थांनी  याबाबत पोलिसांना माहिती देऊन, टेम्पो पोलिस ठाण्यसात नेला.  दरम्यान या घटनेची माहिती मिळताच शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. अन् गायींची तस्करी करणारांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी प्रशासनाने पंचनामा केला अन् महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.ननवरे यांच्यामार्फत गायींची तपासणी केली. या प्रकरणी गावकर्‍यांच्या वतीने नवामोंढा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. यावेळी ग्रामस्थांकडून टेम्पोतील गायींना बाहेर काढून त्यांना चारा टाकण्यात आला.  लोकराज्य मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष व्यंकटराव शिंदे, शिवसेनेचे नगरसेवक अमरदीप रोडे, रितेश जैन, विठ्ठल तळेकर, रामेश्‍वर शिंदे,अरुण पवार, रवी तांबे, चंदू शिंदे ,  तुकाराम शिंदे, वांगीचे ग्रामस्थ रामा शिंदे, परमेश्‍वर खनपटे, देविदास शिंदे, सरपंच सुरेश चांदणे, प्रल्हादराव शिंदे, दादाराव शिंदे, संदीप शिंदे, हरिभाऊ शिंदे, रावसाहेब शिंदे, बाजीराव खनपटे,  गणेश खनपटे, प्रदीप भालेराव आदी उपस्थित होते.