Mon, Mar 25, 2019 17:27होमपेज › Marathwada › शस्त्र परवानाधारकांना मिळणार युआयएन नंबर

शस्त्र परवानाधारकांना मिळणार युआयएन नंबर

Published On: Feb 10 2018 1:34AM | Last Updated: Feb 09 2018 11:36PMबीड : प्रतिनिधी

नॅशलन डाटाबेस ऑफ  आर्म लायसन (एनडीएएल) या प्रणालीद्वारे शस्त्र परवानाधारकांची माहिती गोळा केली जाते.  प्रणालीद्वारे माहिती अद्ययावत केल्यानंतर प्रत्येक परवानाधारकास विशिष्ट ओळख क्रमांक म्हणजेच युनिक आयडेंटीफि केशन (युआयएन) नंबर दिला जातो. ज्या शस्त्र परवानाधारकांकडे यापुढे युआयएन नंबर नसेल त्यांचा परवाना रद्द होणार आहे. 

 केंद्र शासनाच्या गृहमंत्रालयामार्फत  1 एप्रिल 2016 पर्यंतच्या शस्त्र परवानाधारक, शस्त्र  दुरुस्त व खरेदी-विक्री परवानाधारकांची माहिती नॅशलन डाटाबेस ऑफ  आर्म लायसन (एनडीएएल) या प्रणालीमध्ये नोंदविण्याची मुदत 31 मार्च 2018 पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे  1 एप्रिल 2016 पर्यंतच्या सर्व शस्त्र परवानाधारकांनी तातडीने संबंधित जिल्हाधिकारी किंवा पोलिस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधून त्यांच्या शस्त्र परवान्याची माहिती उपलब्ध करून घ्यावी, अशा सूचना राज्य शासनाच्या गृह विभागाने दिल्या आहेत. दरम्यान, यापूर्वी नोंदणीची प्रक्रिया 31 मार्च 2017 रोजी बंद करण्यात आली होती. परंतु आता केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाने अधिसूचनेद्वारे नोंदणी करून घेण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2018 पर्यंत वाढविलेली आहे.  प्रत्येक परवानाधारकास विशिष्ट ओळख क्रमांक  देण्यात येतो. या माहितीमध्ये परवानाधारकाची संपूर्ण माहिती, शस्त्राची तसेच शस्त्र उत्पादक व वितरक आदींची माहिती भरणे आवश्यक आहे. ही माहिती भरल्यानंतर प्रत्येक परवानाधारकास विशिष्ट ओळख क्रमांक घेणे बंधनकारक असून असा क्रमांक न घेतल्यास संबंधित शस्त्र परवानाधारकांचा शस्त्र परवाना रद्द होणार आहे.