Mon, Nov 19, 2018 13:40होमपेज › Marathwada › दोन महिलांच्या भांडणात चावा घेतलेल्या महिलेचा मृत्यू

दोन महिलांच्या भांडणात चावा घेतलेल्या महिलेचा मृत्यू

Published On: Jul 13 2018 8:22PM | Last Updated: Jul 13 2018 8:22PMलातूर : प्रतिनिधी

भांडण करणाऱ्या महिलेने चावा घेतलेल्या  महिलेचा उपचारादरम्यान शुक्रवारी (१२ जुलै)  मृत्यू झाला. पद्मीनबाई शिवाजी कांबळे (५५) असे या महिलेचे नाव आहे.  दोन महिलांमधील भांडण सोडवत असताना गुरुवारी एकीने पदमिनबाईचा कडकडून चावा घेतला होता. 

शहरातील म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या दोन महिलांमध्ये कडाक्याचे भांडण होऊन त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले होते. पद्मीनबाई ते भांडण सोडवण्यास गेल्या होत्या यावेळी एका महिलेने पदमीनबाईच्या हाताचा कडकडून चावा घेतल्याने त्या जखमी झाल्या होत्या त्यामुळे त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, शुक्रवारी पहाटे पद्मिनीबाई यांचा मृत्यू झाला.  त्यांचा कशामुळे मरण पावल्या त्याचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट होईल.